घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर भरधाव वेगाने वाहने जात असल्याने यावर मोठ्याप्रमाणात अपघात होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर निर्बंध आणण्यासाठी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावर वेग उल्लंघन शोध प्रणालीचा बसवण्यात येणार आहे.
अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेतंर्गत मुंबई वाहतूक पोलिसांनी सुचविल्यानुसार रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर निर्बंध आणण्यासाठी एम-पूर्व विभागातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावर वेग उल्लंघन शोध प्रणालीचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे बसविल्याने संबंधित रस्त्यावर निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांकडून ई-चलनद्वारे वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पर्यायाने, दंडात्मक कारवाईच्या भीतीने वाहनांच्या वेगांवर निर्बंध येऊन रस्त्यावरील वाहनांच्या भरधाव वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यामुळे या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावर वेग उल्लंघन शोध प्रणालीचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचा निर्णय घेत यासाठी निविदा मागवली होती.
त्यामुळे यासाठी सुमारे ५५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. याकरता ऍबमॅटीका टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविड करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल आणि ही प्रणाली बसवल्यानंतर एक वर्षांचा दोष दायित्वाचा कालावधी असेल, असे रस्ते व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्ससह औषधसाठा व इतर वैद्यकीय सामग्री खरेदीचे महापालिकेचे निर्देश)
Join Our WhatsApp Community