उत्तम पैसे कमवण्यासाठी कौशल्यांसह मागणी असलेल्या क्षेत्रातील शैक्षणिक पदवी असणे आवश्यक आहे. या सोबतच सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण करावे लागते. यासाठी भारतातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतात. यातूनच ब्रेन ड्रेनच्या समस्येने जन्म घेतला आहे, जी दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होते आहे. भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दर वर्षी भारतातून पुढच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जगातील सर्व विद्यापीठांपैकी ३१व्या आणि कॅनडातील पहिल्या नंबरवर असणाऱ्या एका विद्यापीठाच्या प्राचार्य आणि कुलगुरुपदी विराजमान झालेले पहिले भारतीय म्हणजे हरगुरदिप सिंह. ६८ वर्षांच्या या ज्येष्ठ अभ्यासकाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतातील ब्रेन ड्रेनबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मुलाखतीत ते म्हणाले की, भारताच्या पंजाब प्रांतातील विद्यार्थी परदेशी शिक्षण घ्यायला जातात त्या मागे दोन मुख्य कारणे आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार आयुष्य. दुसरे कारण हे देशासाठी चिंताजनक आहे. चांगले जीवन जगण्यासाठी तरुणांनी देशाबाहेर जाणे याचा हाच अर्थ आहे की, त्यांना भारतात नोकरीच्या चांगल्या संधी मिळत नाही. चांगल्या जीवनमानात अनेक गोष्टींचा समावेश होतो. जसे की कायदा आणि सुव्यवस्था, न्याय, सुरक्षा, स्वच्छता इत्यादी. भारताला या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. देशातले तरुण जर आपण अशा तऱ्हेने गमावत राहिलो, तर भारताचे भविष्य चांगले असणार नाही. एकेकाळी पंजाब प्रांत भारताचा दागिना होता. आजच्या घडीला पंजाबचे तेच महत्त्व अबाधित राहिले आहे की नाही याबद्दल ते साशंक आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याकडे काय कल आहे, हे शोधण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात समोर आलेले सत्य धक्कादायक आहे. दहापैंकी आठ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे.
भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ..
वर्ष २०१७ मध्ये – ४५४,००९ विद्यार्थी परदेशात गेले.
वर्ष २०१८ मध्ये – ५१७,९९८ विद्यार्थी परदेशात गेले.
वर्ष २०१९ मध्ये – ५८६,३३७ विद्यार्थी परदेशात गेले.
वर्ष २०२२ मध्ये – ७५०,३६५ विद्यार्थी परदेशात गेले.
भारतीय विद्यार्थी जात आहेत या देशांत ..
१. इटली
२. अमेरिका
३. जर्मनी
४. कॅनडा
देशात-परदेशात शिक्षण घेऊन तिथले नागरिकत्त्व स्वीकारणारे अनेक भारतीय आज महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परदेशाच्या तुलनेत भारतात कमी पैसे मिळतात. त्यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करते आहे.
जगातील नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावर (सीईओ पदावर) भारतीय वंशाची अनेक माणसे
सुंदर पिचाई – गुगल आणि अल्फाबेट
सत्य नडेला – मायक्रोसोफ्ट
अरविंद कृष्णा – आयबीएम
पुनीत रंजन – डेलॉईट
संजय मल्होत्रा – मायक्रॉन
(हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून ऐतिहासिक सफर; यापूर्वी ‘या’ राष्ट्रपतींनी घेतला होता हा अनुभव)
Join Our WhatsApp Community