जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा उसळली दंगल; कलम १४४ लागू, ६० पेक्षा अधिक जणांना अटक

110
योगी आदित्यनाथ
Yogi adityanath

झारखंड राज्यातल्या जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा दंगल भडकली आहे. यावेळी जमशेदपूरमधल्या शास्त्रीनगरमध्ये कथित धार्मिक झेंडाच्या अपमानानंतर दोन गटात दगडफेक झाली. दुकाने जाळण्यात आली. या हिंसाचारानंतर इथली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच जमदेशपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

एसएसपी प्रभात कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती नियंञणात आणली गेली असून काहींना अटक करण्यात आली. आता परिस्थिती बघून इंटरनेट सेवा पूर्ववत केली जाईल. तसेच कोणी नागरिक जखमी न झाल्याची माहिती ही त्यांनी दिली. जमाव नियंत्रण करण्यांसाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या.

नेमके काय घडले?

जमशेदपूरमधल्या शास्त्रीनगरमध्ये दोन गटात दंगल उसळली. जमावातून एका तरुणाने गोळीबार केला. असे बोलले जाते की पोलिसांना हा धोका ओळखता आला नाही. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी इफ्तारच आयोजन केलेले. याचवेळेला एका गटाकडून दगडफेक सुरू केली. काचेच्या बाटल्या फेकल्या गेल्या. दगडफेकीनंतर हिंसा भडकली. माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत ६० पेक्षा अधिकजणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात पोलीसही जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू-मेबर्सला बेदम मारहाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.