देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरून (Petrol And Diesel Price) नेहमी चर्चा होतांना दिसते. मागील काही वर्षांपासून देशातील इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. गेल्या मे २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहे. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये ५ आणि ३ रुपयांनी कपात केली. त्यामुळे राज्यातील इंधनाचे दर काहीसे कमी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळावर २५ एप्रिल रोजी देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत बदल झाला आहे. मात्र दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बदल झालेला नाही. तर चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात १० पैसे तर डिझेलच्या दारात ९ पैशानी वाढ झाली आहे. त्यामुळे चेन्नईमधील पेट्रोलचे दर १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये झाले आहे. (Petrol And Diesel Price)
अशातच मंगळवार २५ एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑईलच्या दरात ०.०९ टक्क्यांनी किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे डब्ल्यूटीआय तेलाची किंमत प्रति बॅरल ७८.६९ डॉलर इतकी झाली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ०.११ टक्क्यांनी घसरली असून तिची किंमत प्रति बॅरल ८२.६४ इतकी झाली आहे. (Petrol And Diesel Price)
कच्च्या तेलांच्या किंमतीत झालेल्या या बदलामुळे लवकरच देशातील इंधनाच्या दरात देखील बदल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Petrol And Diesel Price)
(हेही वाचा – बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली)
Join Our WhatsApp Community