तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये २४४.८३ च्या स्ट्राईक रेटने धावा करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. केकेआरविरूद्ध रविवारी २९ चेंडूत ७१ धावांची फटकेबाजी करणाऱ्या रहाणेचे यंदा हे दुसरे अर्धशतक होते. याचा फायदा होत अजिंक्यचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
( हेही वाचा : Petrol And Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल; लवकरच देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार परिणाम)
अजिंक्य रहाणे पुन्हा कसोटी संघात
जागतिक कसोटी चॅम्पियन्शिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर झाला असून यात रहाणेचे पुनरागमन झाले आहेत. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघासाठी जबरदस्त कामगिरी करत आहे. अजिंक्य रहाणे २०२२ ला अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
एक वर्ष संघाबाहेर राहणाऱ्या रहाणेने या वर्षीच्या दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केले होती. ज्यामध्ये तीन शतक तर रणजी ट्रॉफीत एक दुहेरी शतक लगावले आहे. या दोन्ही स्पर्धेमध्ये मिळून एकूण ६३४ धावा केल्या. आयपीएलमध्ये रहाणे २०० च्या स्ट्राईकने खेळत आहे. त्याच्या या कामगिरीचा आढवा घेऊन त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांची ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत CBI कडे तक्रार! पंतप्रधान-ईडीला केले टॅग)
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
जागतिक कसोटी चॅम्पियन्शिपचा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा अखेरचा सामना ७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या ओवल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी रहाणेची वर्णी लागली आहे. यामुळे भारतीय संघ अजून भक्कम होणार आहे.
बेस किंमतीत घेतले होते विकत
दरम्यान, यंदा २०२३ च्या आगामी हंगामासाठी कोचीमध्ये मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावादरम्यान युवा तसेच इंग्लंडच्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली. परंतु मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणेच्या पदरी यंदा निराशा आली होती. यानंतर त्याला चेन्नई सुपरकिंग्सने फक्त ५० लाखांना विकत घेतले आहे. या लिलावात सर्वाधिक बोली सॅम करन या इंग्लंडच्या गोलंदाजावर लावली गेली होती.
WTC फायनलसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दूल ठाकुर, जयदेव उनाडकट.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community