अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin Vaze याने तुरुंगात घरचे जेवण देण्याची परवानगी मिळावी म्हणून एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात असणारा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin Vaze याला मधुमेहाचा त्रास असून त्यामुळे त्याची दृष्टी कमजोर झाली आहे. तुरुंगात जेवणात डाळ भात आणि पाव मिळत असून डॉक्टरांनी त्याला जेवणात भात आणि पाव टाळण्यासाठी सांगितले असल्याचे वाझे याने एनआयएच्या विशेष न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे त्याला घरच्या जेवणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वाझे याने न्यायालयाकडे केली आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीच्या सुट्टीवर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)
मधुमेह उच्च पातळीवर गेला असून त्याचा डोळ्यांवर परिणाम झाला आहे. ज्यामध्ये त्याला काचबिंदूमुळे दृष्टी गमावण्याचा उच्च धोका असल्याचे वाझे Sachin Vaze याने अर्जात म्हटले आहे. या अर्जावर न्यायालयाने तुरुंग प्रशासन आणि एनआयएकडे आपले म्हणणे मांडण्यास सांगितले असून पुढच्या आठवड्यात या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community