आपल्याकडे अगदी देवी-देवतांच्या काळापासून ‘लग्न’ या प्रकाराला फार महत्त्व आहे. प्रत्येक राजाराणीच्या गोष्टीत ‘लग्न’ हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. ‘…आणि राजा राणी लग्न करून सुखाने नांदू लागले.’ अशाच विधानाने बऱ्याच गोष्टींचा शेवट होतांना आपण पाहिले, ऐकले, आणि वाचलेले आहे. मात्र कालांतराने लग्न या प्रेमाच्या सोहळ्यात ‘मान-अपमान’ या प्रकाराचे वर्चस्व अधिक वाढलेले दिसून येते. (Chhatrapati Sambhaji Nagar)
…आणि झाला राडा
अशातच मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण तालुक्यातील थापटी तांडा या गावात एक लग्न सोहळा संपन्न झाला. या लग्नाला पुण्याहून वऱ्हाडी आले होते. ठरल्याप्रमाणे शनिवार २२ एप्रिल रोजी लग्न लागले. मात्र यावेळी वधु पक्ष आणि वर पक्ष यांच्यात मानपानावरून वाद झाले. या वादाने नंतर राड्याचं रूप धारण केलं.
(हेही वाचा-Petrol And Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल; लवकरच देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार परिणाम)
१० ते १२ जण गंभीर जखमी
दोन्ही गटातील तरूण एकमेकांवर हल्ला करत होते. यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आली. यात दोन्ही बाजूचे १० ते १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना (Chhatrapati Sambhaji Nagar) पाचोडच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन्ही गटांमधील लोकांनी पोलिसात याबाबत तक्रार केलेली नाही. पण लग्नात झालेल्या हाणामारीची चर्चा जोरदार सुरु आहे.