Potholes Problem : आता अॅपवरून करा खड्ड्यांची तक्रार; बांधकाम विभागाचं नवं अॅप

245

प्रत्येक वर्षी जवळपास दीड लाख लोक रस्त्यावर होणाऱ्या अपघातात स्वत:चा प्राण गमावतात. प्रत्येक दिवशी ११३० अपघात होतात. या अपघातांमध्ये ४२२ लोक मृत्यूमुखी पडतात. अपघात होण्यामागे नानाविध कारणं असली तरी रस्त्यावरील खड्डे या मागचं प्रमुख कारण असतात. रस्त्यावर खड्डे (Potholes Problem) आहेत की खड्डयात रस्ते आहेत असा प्रश्न नागरिकांना पडतो. खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. दररोज होणारा हा त्रास आता संपण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचं डिजिटल पाऊल…

काही दिवसांपूर्वी संतप्त नागरिकांनी चक्क खड्ड्यांचा (Potholes Problem) वाढदिवस साजरा केला होता. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.  कोणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करतं तर कोणी स्वत: कुदळ, फावडं घेऊन रस्त्यावर उतरतं. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नव्या निर्णयामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा मुंबईत आता भर पावसातही भरले जाणार खड्डे, रिऍक्टीव्ह अस्फाल्ट तंत्राचा वापर करणार महापालिका)

तक्रार करणं झालं एकदम सोपं…

सार्वजनिक बांधकाम खात्याने “पीसीआरएस” नावाचं एक अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची (Potholes Problem), उखडलेल्या रस्त्यांची थेट तक्रार करता येणं शक्य झालं आहे. मोबाईलमध्ये फोटो काढायचा आणि इतर तपशील भरून अॅपवर पोस्ट करायचा. केलेल्या तक्रारीवर विभागाने कोणती कारवाई केली याची माहिती तक्रारदाराला मिळणार आहे. दर सात दिवसांनी उपअभियंता स्तरावर या तक्रारींच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.