सातारा जिल्ह्यतील फलटण शहरामध्ये श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ, मलटण या ठिकाणी सरकारी जागेवर अनधिकृत मशीद उभारण्यात आली आहे. ती मशीद हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयायने २७ जुलै २०१३ रोजी दिले आहेत. असे असतांनाही गेले १० वर्षे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, फलटणचे तहसीलदार, प्रांत अधिकारी, तसेच सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु एकता आंदोलन, हिंदू जनजागृती समिती या संघटनांनी पत्रकार परिषदेत केली.
तर हनुमानाचे मंदिर बांधून महाआरती करणार
या सरकारी जागेवर फलटण नगर परिषदेकडून नवीन बांधकाम होऊ न देण्याची दक्षता नगर परिषद घेत आहे, असे लेखी पत्र फलटणचे तहसिलदार यांना पत्र देऊनही सदर जागेत नव्याने बांधकाम करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे म्हणजे ‘आंधळे दळतय अन् कुत्रं पीठ खातंय’ असा भोंगळ कारभार स्थानिक प्रशासनाकडून चालू आहे. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याऐवजी त्याला संरक्षण दिले गेले व पुन्हा नवीन बेकायदेशीर बांधकाम करतांना कोणताही विरोध केला नाही. यावरून स्थानिक प्रशासन आणि आरोपी यांच्यात ‘अर्थ’ पूर्ण संगनमत झाले असल्याची दाट शक्यता वाटते. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम हे स्थानिक प्रशासनाकडून निष्कासित केले जाईल असे वाटत नाही. त्यामुळे मशिदीचे अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत पाडण्यात यावे अन्यथा नाईलाजाने आम्हाला मशिदीसमोर मारूतीचे मंदिर बांधून तेथे महाआरती करावी लागेल, असा इशारा दिला. तसेच या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे संबंधित अधिकार्यांकडून गंभीर चूक झाली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले गेले नाही, ही गंभीर चूक केली आहे. तरी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच त्यांचे वेतन आणि भत्ते गोठवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
(हेही वाचा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची माहिती प्रसारित करण्यास वृत्तवाहिन्यांना न्यायालयाची मनाई)
Join Our WhatsApp Community