जनतेचे रक्षकच ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत; गुन्हा दाखल

111

हिंगोली पोलीस स्थानकातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. सुनील गिरी असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांच्या या वर्तनामुळे वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

सुनील गिरी हे आपली रात्रपाळी करत होते. बाहेर चौकशीसाठी आणि गस्तीसाठी जात असतांना त्यांनी दारू प्यायल्याचे लक्षात आले. त्यांना व्यवस्थित उभं राहण्यास त्रास होत होता, त्यांचे उच्चार बोबडे झाले होते. तसेच एका विशिष्ठ प्रकारचा वास येत असल्याने ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पस्ट झाले. त्यांची ही अवस्था लक्षात येताच औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली. त्यावरून वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे औंढा पोलीस ठाण्यात कलम ८५ [१] नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप किशनराव नाईक यांच्या फिर्यादिनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे करत आहेत.

(हेही वाचा अदानींनी जाहीर केला मागील चार वर्षांचा जमाखर्च; राहुल गांधींच्या टीकेला चोख उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.