काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ईडीकडून मुश्रीफांविरुद्ध ही कारवाई सुरु आहे. अशातच हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात आपला अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी टीका केली होती.
(हेही वाचा अदानींनी जाहीर केला मागील चार वर्षांचा जमाखर्च; राहुल गांधींच्या टीकेला चोख उत्तर)
Join Our WhatsApp Community