बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली असून भाजपचे (BJP) गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवार २५ एप्रिल रोजी साईनगरात लावलेल्या विकास कामाच्या फलकाला काळं फासलं. त्यामुळे अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा (Ravi Rana) श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी केला आहे.
हेही पहा –
रवी राणा (Ravi Rana) आणि भाजप मधील नेमका वाद काय?
तुषार भारतीय यांनी मंगळवार २५ एप्रिल रोजी सकाळी प्रभाग क्र १९ साईनगर येथील सातुर्णा चौक ते अकोला रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जावून काळं फासलं. आमदार रवी राणांनी (Ravi Rana) नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे श्रेय घेतले असा आरोप यावेळी त्यांनी केला. जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना दहा दिवसापूर्वीच अल्टीमीटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका, तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही पण त्यांनी काढले नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका मात्र त्यांनी काढले नाही. आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं आहे, असे तुषार भारतीय म्हणाले. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजान नागरीक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठलेही नगरसेवक असा प्रकार कदापी सहन करणार नाही, असे माजी महापौर चेतन गावंडे म्हणाले.
(हेही वाचा –Maharashtra Politics : शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवर शिंदे गटाचा गौप्यस्फोट)
दहा दिवसांपूर्वी दिला होता अल्टिमेटम – तुषार भारतीय
आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या बोर्ड संदर्भात आपण आमदार राणा (Ravi Rana) यांना १० दिवस आधी एक पत्र दिले होते. त्यांनी लावलेले विकास कामांचे जे काम त्यांनी केलेच नाही ते बोर्ड काढण्याचे संगीतले होते मात्र दहा दिवस होऊन सुद्धा आमदार राणांनी बोर्ड न काढल्याने आम्ही त्यावर काळे फासले व कार्यकर्त्यांनी बोर्डाची तोडफोड केली.
Join Our WhatsApp Community