जगात अशी अनेक मुलं आहेत जी अत्यंत हुशार आहेत, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. आणि काही अशीही मुलं आहेत जी शाळेत जातात व त्याचबरोबर नोकरी किंवा रस्त्यावर उभं राहून छोटासा व्यवसाय देखील करतात. त्यातली काही मुलं मोठी होऊन शिक्षणात पराक्रम गाजवतात आणि मोठ्या पदावर रुजू होतात.
आता सोशल मीडियावर छत्तीसगढमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एसीपी, आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव एका फुगे विकणार्या मुलासोबत चर्चा करताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ पाहून वापरकर्त्यांनी अभिषेक पल्लव यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आणि त्या लहान मुलाचे कौतुक केले आहे.
(हेही वाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सिल्वर ओकवर बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा)
या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. अभिषेक पल्लव यांनी त्या लहान मुलाकडून सर्व वस्तू विकत घेऊन त्याची मदत केल्याचे आपल्याला दिसत आहे. हा मुलगा छत्तीगढमधील दूर्गच्या रस्त्यावर फुगे विकण्याचे काम करतो. हा मुलगा आपलं काम करत असताना आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लक त्याच्याजवळ गेले.
हा सुंदर व्हिडिओ जरुर पाहा:
https://www.facebook.com/lakhisarailive/videos/204054538997063/
पल्लव यांनी त्या मुलाला विचारलं की हा फुगा कितीला आहे? त्यावर मुलाने २० रुपये असं उत्तर दिल. मग अभिषेक पल्लव यांनी गणिताचा एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, “जर मी तुझ्याकडून २० फुगे विकत घेतले तर किती रुपये होतील?” त्या मुलाने फारसा विचार न करता ४०० रुपये असं उत्तर दिलं आणि हे उत्तर ऐकून आयपीएस अधिकारी खुश झाले आणि म्हणाले की या मुलाचं गणित खूप चांगल आहे. हा अभ्यासात हुशार असणार. खुद्द पोलिसांनी कौतुक केल्यामुळे मुलाच्या चेहर्यावर हसू फुललं. हा लहान मुलगा पहिलीत शिकतो आणि संध्याकाळी फुगे विकतो. अशी मुलं भारतात आहेत म्हणूनच भारताची प्रगती होत आहे आणि असे पोलिस आहेत म्हणून आपला देश सुरक्षित आहे.
Join Our WhatsApp Community