पाणी म्हणजे जीवन. असं म्हणतात की कधीच कुणाला पाण्यासाठी ’नाही’ म्हणू नये. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एक धावपटू शर्यतीच्या वेळी दुसर्या धावपटूला पाणी पाजू शकतो? हे असं खरोखर घडलं आहे. ‘World of history’ या ट्विटर हॅंडलवरुन एक फोटो व्हायरल (Viral Photo) झाला आहे.
हा व्हायरल झालेला फोटो (Viral Photo) २०१० मधला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला धावपटू तिच्या सोबत धावणार्या दिव्यांग पुरुष धावपटूला पाणी पाजत आहे. आणि या कृतीमुळे ती महिला शर्यत हरते. जर ती पाणी पाजायला थांबली नसती तर कदाचित ती जिंकली असती.
A Kenyan athlete Jacqueline Nyatipei helping a disabled co-athlete to drink water while running in 2010.
She lost her first place but won many hearts. pic.twitter.com/st9O2FpDJn
— World Of History (@UmarBzv) April 21, 2023
(हेही वाचा –अजिंक्य रहाणे कसोटी संघात! कमबॅक असावे तर असे…यामुळे झाले पुनरागमन)
परंतु या महिला खेळाडूला विजयापेक्षा माणुसकी महत्वाची वाटली. तिने त्या पुरुष धावपटूला पाणी पाजलं आणि ती शर्यत हरली. पण तिच्या ह्या माणुसकीच्या कृतीमुळे जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. हा फोटो जुना असला तरी अनेकांना प्रेरणा देणारा आहे. World of history या ट्विटर हॅंडलवरुन हा फोटो व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा जुनी आठवण ताजी झाली.
हेही पहा –
हा फोटो पाहून लोक म्हणाले की या महिलेने माणुसकी जीवंत ठेवली आहे. लोकांनी या फोटोवर पुष्कळ कमेंट्स केले आहेत. ती शर्यत हरली असली तरी तिने लाखो लोकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे या महिला धावपटूने एक छोटीशी कृती केली आणि त्याद्वारे एक मोठा संदेश दिला.
Join Our WhatsApp Community