नाशिक आदिवासी विकास विभाग येथे पहिल्यांदाच झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात लेखक व गणित अभ्यासक हेमंत चोपडे यांचा आदिवासी भागातील सेवा तसेच साहित्य क्षेत्रातही स्पृहणीय कामगिरीसाठी गौरव करण्यात आला. संमेलनाध्यक्ष तसेच निवृत्त आयुक्त रामचंद्र कुलकर्णी तसेच आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हेमंत चोपडे यांना ‘आदीसेवा साहित्य सन्मान 2023’ हा पुरस्कार प्रदान करत गौरविण्यात आले.
हेमंत चोपडे हे सध्या आदिवासी क्षेत्रात कार्यरत आहेत. ते पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड येथे सोळा वर्ष सेवारत होते. त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित असून नुकतेच त्यांचे शून्य एक अनंत प्रवास हे संशोधनात्मक पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘भारतरत्नांच्या देशा ‘, ‘ सावरकर – आंबेडकर एक समांतर प्रवास ‘, ‘ गवताला फुटली भाले’ असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्कार, वीर जगदेवराव साहित्य पुरस्कार, अंकुर वाङ्मय पुरस्कार, शैक्षणिक संशोधनासाठीचे सर फाउंडेशन नवोपक्रम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शै. संशोधन परिषद राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community