गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार बुधवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
( हेही वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीच्या आरोपपत्रात तूर्तास अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव नाही )
मविआत मतभेद
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरून शरद पवारांनी केलेले भाष्य, वीर सावरकरांचा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीच्या मुद्यावरून ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका मात्र त्याचे पवारांनी केलेले समर्थन, अदानी यांचे पवारांनी केलेले समर्थन अशा अनेक मुद्द्यांमुळे मविआमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहावर भेट होणार
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती-पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार असून अजित पवार विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
Join Our WhatsApp Community