अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेत्याची पुणे पोलिसात तक्रार

128

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी अजित पवारांविरोधात ही तक्रार दिली आहे. या सर्व प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र अजित पवार यांनी यावर आपली कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

( हेही वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीच्या आरोपपत्रात तूर्तास अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव नाही)

रवींद्र साळगावकर हे पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यासमोरील एका मोकळ्या प्लॉटची मोजणी केल्यामुळे रवींद्र यांना सतत धमकी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. काही दिवसांपूर्वी या मोकळ्या प्लॉटची मोजणी करू नये असे न्यायालयाकडून आदेश देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील या प्लॉटच्या मोजणीचे काम सुरूच होते.

या मोकळ्या प्लॉटचा ताबा रवींद्र साळगावकर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना या संदर्भात सतत धमकी मिळत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी पुणे शहर तहसील कार्यालयात देखील तक्रार नोंदवली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर खडक पोलीस स्थानकात या प्रकाराची लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.