मुंबई महापालिकेच्या शाळांमधील (BMC School) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या २७ शालेय साहित्यांच्या वाटपाला मागील वर्षी झालेल्या विलंबानंतर आगामी शैक्षणिक वर्षात या सर्व शालेय वस्तूंचे वाटप अगदी शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती शालेय वस्तूंचे किट उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यासाठी महापालिका शालेय विभागाच्या शिफारशीनुसार मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून या साहित्यांच्या खरेदीसाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये शाळा सुरु झाल्यानंतरही साहित्यांच्या खरेदीची निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले होते. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी मुलांना या साहित्यांचे वाटप होऊ लागले होते. मात्र, कंत्राटदारांकडून हे साहित्य विलंबाने होत असल्याने तत्कालिन सहआयुक्त अजित कुंभार यांनी सर्व कंत्राटदारांना दमात घेत मुलांना नियोजित वेळेत हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कंत्राटदारांना हे साहित्य तातडीने पुरवठा करावे लागले होते.
(हेही वाचा –रस्ते कंत्राट: आदित्य ठाकरे म्हणतात, चहल यांचा कारभार अपारदर्शक)
परंतु मागील शैक्षणिक वर्षांत शालेय वस्तू वाटपाला झालेल्या विलंबानंतर आगामी शैक्षणिक वर्षांत हे नियोजित वेळेतच मुलांना मिळणार आहे. मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) मुलांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यास विलंब होत असल्याने मागील वर्षी प्राथमिक स्थितीत इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गांमधील छत्री वाटपाऐवजी पैसे वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. या छत्रीच्या खरेदीकरता विद्यार्थ्यांना प्रत्येकी २७० रुपये मुख्याध्यापकांमार्फत वितरीत करण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांना छत्री खरेदी करून देण्यात आली होती. छत्री आणि रेनकोट हे दोन वर्षांतून एकदा दिले जात असून बाकी सर्व साहित्य वर्षांतून एकदा दिले जाते. त्यामुळे छत्री आणि रेनकोट वगळता गणवेश तसेच इतर साहित्याचा संच मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळेल असा विश्वास सहआयुक्त अजित कुंभार यांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील (BMC School) मुलांना शालेय साहित्यांचे वितरण विलंबाने झाल्यानंतर प्रत्यक्षात या साहित्यांची मागणीही वाढली गेली आहे. मुंलांची पटसंख्या वाढल्याने या साहित्यांची मागणीही वाढली गेली. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या शुज अँड सँडल, कॅनवास बूट व मोजे आणि स्टेशनरी साहित्यांची मागणी अधिक वाढल्याने याचा खर्चही वाढला गेला आहे. पुरवठा करण्याच्या परिमाणांमध्ये वाढ झाल्याने यासाठीचा खर्च तब्बल साडेबारा कोटींनी वाढला गेल्याची माहिती समोर आली होती.
Join Our WhatsApp Community