उद्योगपती केशब महिंद्रा काळाच्या पडद्याआड

यंदाच्या म्हणजेच २०२३ च्या फोर्ब्समधील अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.

123

भारतातील अनेक यशस्वी उद्योगपतींपैकी एक असणारे केशब महिंद्रा यांचे निधन झाले आहे. त्यांनी १२ एप्रिल २०२३ रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केशब महिंद्रा हे आनंद महिंद्रा यांचे काका होते. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ते पूर्व चेअरमन देखील होते. त्यांनी जवळपास ४८ वर्षे चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळला. २०१२ मध्ये त्यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला.

यंदाच्या म्हणजेच २०२३ च्या फोर्ब्समधील अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांची एकूण संपत्ती ही १.२ अब्ज डॉलर इतकी होती. ९ ऑक्टोबर १९२३ रोजी शिमला येथे जन्म झालेल्या केशब महिंद्रा यांनी १९४७ पासून काम करण्यास सुरुवात केली आणि १९६८ रोजी त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. केशब महिंद्रा यांनी विविध सरकारी समित्यांमध्ये आपले योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे उद्योगक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा नवी मुंबईकरांचे हाल! गेल्या ३ दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी वणवण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.