Heat Wave : एप्रिल महिन्यानंतर मे महिन्यात तापमान चिंता वाढवणार; पाऊस लांबणार

काही दिवसांपूर्वी केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनीही भारतातील उष्णतेवर आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये भारताचा ९० टक्के भाग हा उष्णतेच्या धोकादायक झोनमध्ये असल्याचे म्हटले होते.

320

एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाने काही जणांना प्राण गमवावे लागले, इतका वाढलेला उकाडा लोकांना असह्य झाला असताना पुढचा मे महिनाही तितकाच त्रासदायक असणार आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (WMO) ने या तापमान वाढीला Heat Wave अल नीनो जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असे या संस्थेने म्हटले आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार मे महिन्यात अल नीनोचा परिणाम दिसू लागणार आहे. याचा परिणाम मान्सूनवरही दिसेल. देशातील ७० टक्के शेती ही मान्सूनवर केली जाते. या पावसावर सर्व शेतकरी अवलंबून असतात. काही दिवसांपूर्वी केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनीही भारतातील उष्णतेवर आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये भारताचा ९० टक्के भाग हा उष्णतेच्या धोकादायक झोनमध्ये असल्याचे म्हटले होते. हा अहवाल PLOS Climate मध्ये प्रकाशित झाला होता. या अहवालानुसार मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा उष्णतेच्या लाटेमध्ये Heat Wave समावेश आहे. या भागात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे या अहवालात म्हटले आहे. पुढील 7 दिवसात भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट Heat Wave  नसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 25 ते 27 एप्रिल दरम्यान ओडिशात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 25-26 एप्रिल रोजी विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी तर 25 ते 27 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

(हेही वाचा MSRTC Bus Accident : शिवशाही बसला पनवेल येथे भीषण अपघात; बसमध्ये होते ४० प्रवासी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.