ChatGPT झाला नापास; जेईई अॅडव्हान्स्डमध्ये अपयशी

113

मागच्या वर्षीच्या अखेरीस ओपनएआय या कंपनीने त्यांचा पहिला चॅटबॉट सादर केला होता. गुगलला टक्कर देणारं याचं तंत्रज्ञान विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाच उत्तर द्यायला सक्षम आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांमध्ये १० लाख युजर्सपर्यंत पोहोचणाऱ्या चॅट जीपीटीचा वापर जगभरातील कोट्यवधी माणसं त्यांचं जीवन अधिक वेगवान करण्यासाठी नियमितपणे करतात.

कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सक्षम असलेल्या या नव्या चॅटबॉटमुळे अनेकांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जगभरातील नानाविध आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांचे प्रश्न चॅट जीपीटीला विचारण्यात आले. त्यातील काही परीक्षा त्याने लीलया पार केल्या तर काही परीक्षांमध्ये मार खाल्ला.

भारतातील तरूण मुले ज्या यू्पीएससी परीक्षा पास होतात, त्या परीक्षेत चॅट जीपीटी नापास होताना दिसला. एआयवर आधारित असलेलं चॅट जीपीटी भारतातील आणखी एक परीक्षा पार करण्यात अपयशी ठरला, ती परीक्षा म्हणजे जेईई अॅडव्हान्स्ड.

(हेही वाचा Gita GPT: गुगल इंजिनियरने तयार केलं AI Chatbot गीता GPT; सोडवली जाणार तुमची प्रत्येक समस्या)

आयआयटी, एनआयटी या नावजलेल्या सरकारी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील लाखो युवक – युवती दरवर्षी जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा देतात. या परीक्षेतला चॅट जीपीटीचा परफॉर्मन्स निराशाजनक होता. यात चॅटबॉटने निगेटिव्ह गुण प्राप्त केले. याबद्दल आयआयटी दिल्लीचे माजी संचालक, प्रोफेसर राम गोपाल राव म्हणाले की, “जेईई ही एक कठोर परिमाणात्मक परीक्षा आहे. ही परीक्षा चॅट जीपीटीसाठी एक महत्त्वाचं आव्हान म्हणून सादर करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणजे चॅट जीपीटी परीक्षेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि जेईई अॅडव्हान्स्डच्या दोन्ही पेपरमध्ये फक्त ११ प्रश्नांची उत्तरे देऊ शकला.”

आणखी एक आव्हानात्मक परीक्षा म्हणजे नीट. यात परीक्षार्थीला एकूण २०० प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एकूण १८० प्रश्न सोडवणं अनिवार्य असतं. चॅट जीपीटीला सुद्धा त्याच न्यायाने प्रश्न विचारण्यात आले. ८०० मार्कांच्या या परीक्षेत या तंत्रज्ञानाने फक्त ३५९ मार्क प्राप्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.