मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर २४ तासांत उभे झाले घर

116
लालबाग

सध्या आपल्या येथील हवामानाचा काही अंदाज लावता येत नाही. कधी पाऊस, कधी थंडी तर कधी अगदी रखरखीत ऊन. अशातच गेल्या काही महिन्यांपासून अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बऱ्याच ठिकाणी वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले, अनेकांचे संसार उघड्यावर आले.

या सगळ्या परिस्थितीचा, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ एप्रिल २०२३ रोजी  अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी वनकुटे गावातील वादळामुळे अनेकांचे रस्त्यावर आलेले संसार पाहून त्यांनी नुकसान भरपाईचे आश्वासन दिले. त्यानंतर २४ तासाच्या आता यावर कारवाईला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. वनकुटे गावातील हिरामण बर्डे आणि कचरू वाघ या दोन कुटुंबियांना एका रात्रीतून घरं बांधून मिळाली. यावरून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

(हेही वाचा अजित पवार घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण, नेमके कारण काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.