राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी घडतांना दिसत आहेत. सरकार आणि विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीका करण्याची एकदेखील संधी सोडत नाही आहेत. अशातच सध्या ‘बारसू रिफायनरी’ प्रकल्पावरून सध्या जोरदार राजकारण सुरु झाले आहे. सरकारच्या या प्रकल्पाला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली.
(हेही वाचा –Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)
बारसू रिफायनरी प्रकल्प : शिंदे आणि पवार यांच्यात चर्चा
शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून बारसू रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. स्थानिक नागरिकांकडून विरोध का होत आहे? स्थानिक पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? स्थानिकांमधील नाराजीचा सूर बदलण्यासाठी सरकार काय करणार या अशा सगळ्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारसू रिफायनरी या प्रकल्पासाठी विरोध होत आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) सावध भूमिका घेतांना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात झालेल्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांना डावलेलं दिसत आहे. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
मिळालेल्या माहितीनुसार बारसू प्रकल्पावरून बुधवार २६ एप्रिल रोजी सकाळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत आणि त्याच्यात नेमकी काय चर्चा झाली हे सांगितले. यावेळी पत्रकारांकडून ‘मुख्यमंत्री बदलणार’ या संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर शरद पवार यांना विचारलं असता; “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर मी याबाबत प्रतिक्रिया देईन” असं त्यांनी सांगितलं.
नेमके प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रजेवर गेले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या. या सर्व प्रकरणावर शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता; “मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला कोणाला सांगायचं काही कारण नाही. असं काही होणार असल्याचं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते एक पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.” अशा भाषेत त्यांनी उत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community