म्हाडाच्या (Mhada Lottery) मुंबई मंडळाने २०२३ च्या सोडतीसाठी अनामत रक्कमेत वाढ करणार नसल्याचे जाहीर केले होते. ही सूचना अत्यल्प व अल्प गटासाठी लागू होती. परंतु आता मंडळाने अत्यल्प व अल्पसह सर्व उत्त्पन गटाच्या अनामत रक्कमेत वाढ केली जाणार अशी माहिती समोर येत आहे.
( हेही वाचा : लालबागमधील धक्कादायक घटना! पत्नीवर संशय; आधी ११ वर्षाच्या मुलीची हत्या करून शेअर्स ब्रोकरने संपवले आयुष्य)
म्हाडा (Mhada Lottery) किती रक्कम वाढणार?
अत्यल्प गटासाठी २५ हजार, अल्प गटासाठी ५० हजार, मध्यम गटासाठी एक लाख रूपये तर उच्च गटासाठी दीड लाख रूपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
२०२३ मध्ये म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडती नंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. रक्कम वाढल्यामुळे या दोन्ही मंडळाच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांची नाराजी
म्हाडाकडून (Mhada Lottery) स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. मात्र अनामत रक्कमेत वाढ होत असल्याने सर्वसामन्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. उत्पन्नगटांवर आधारित, राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. इडब्यूएस, एलआयजी, एचआयजीमध्ये हे विभागलेले आहेत.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community