Indian Railway : तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकिटावर दुसऱ्या व्यक्तीला करता येणार प्रवास! जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया…

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी एक महत्त्वाच निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे.

371
Indian Railway

लांब पल्लाच्या प्रवासासाठी सर्वसामान्य माणसे नेहमीच रेल्वेचा (Indian Railway) पर्याय निवडतात. प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्न करते. आता प्रवास सुरू होण्यापूर्वी प्रवाशांना होणारा एक त्रास रेल्वेने दूर केला आहे.

( हेही वाचा : Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)

IRCTC ने घेतला निर्णय

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी एक महत्त्वाच निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे.

तुमच्या रेल्वे (Indian Railway) तिकिटावर कोणालाही करता येईल प्रवास

  • पूर्वी ज्याच्या नावावर तिकीट आहे, त्याच व्यक्तीने संबंधित तिकिटावर प्रवास करणे बंधनकारक होते. जर दुसऱ्या व्यक्तीने त्या तिकिटावर प्रवास केला तर तो बेकायदेशीर मानला जात असे. मात्र IRCTC च्या निर्णयामुळे आता असा दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे कायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणांमुळे तुम्हाला प्रवास करणे शक्य नसेल तर तिकीट कॅन्सल करण्याशिवाय दुसरा पर्याय तुम्ही वापरू शकता.
  • तुमच्या कन्फर्म रेल्वे (Indian Railway) तिकिटावर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला प्रवास करता येईल. भाऊ, बहीण, पती, पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी यांच्या नावे तुम्ही तिकीट ट्रान्सफर करू शकता.

( हेही वाचा : लालबागमधील धक्कादायक घटना! पत्नीवर संशय; आधी ११ वर्षाच्या मुलीची हत्या करून शेअर्स ब्रोकरने संपवले आयुष्य)

Indian Railway
Indian Railway

तिकीट ट्रान्सफर केव्हा होऊ शकते ?

ट्रेन सुटण्याच्या काही तास आधी तिकीट ट्रान्सफर करण्याची विनंती करणे अपेक्षित आहे. जर ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी ट्रान्सफरची विनंती करण्यात आली नाही, तर तुमच्या तिकीटावर दुसऱ्या कोणाला जाता येणार नाही. तसेच तिकिटांचे ट्रान्सफर वारंवार करता येणार नाही. तिकीट ट्रान्सफर हे फक्त एकदाच होऊ शकते.

तिकीट ट्रान्सफर करणे सोपे आहे ?

  • तिकिटाची प्रिंट आऊट काढा.
  • ज्याला तिकीट ट्रान्सफर करायचे आहे त्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सोबत घ्या.
  • जवळच्या रेल्वे स्टेशनला जा.
  • तिथे काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अर्ज भरा.
  • अशाप्रकारे तुम्ही अगदी सहज तिकीट ट्रान्सफर करू शकता.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.