सोन्याच्या तस्करीसाठी परदेशी महिलांचा वापर; मुंबई विमानतळावर १८ सुदानी महिलांना १६ किलो सोन्यासह अटक

मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरूसह देशातील ३९ विमानतळावर सोन्याच्या तस्करीत (Gold Smuggling) मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

199
Mumbai airport 18 Sudan women arrested Gold Smuggling
सोन्याच्या तस्करीसाठी परदेशी महिलांचा वापर; मुंबई विमानतळावर १८ सुदानी महिलांना १६ किलो सोन्यासह अटक

सोन्याचे भाव जसेजसे गगनाला भिडत आहे, तसतसे भारतात सोन्याच्या तस्करीत (Gold Smuggling) मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोन तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी तस्करीसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकतीच मुंबई विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या १८ सुदानी नागरिक असलेल्या महिलांना अटक केली आहे. या महिलांजवळून डीआरआयने १६ किलो सोन जप्त केले आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलांचा वापर केवळ कॅरिअर म्हणून वापर करण्यात आला असून भारतात या महिलांच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या एका भारतीयाला देखील मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून टोळीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न डीआरआयकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – लालबागमधील धक्कादायक घटना! पत्नीवर संशय; आधी ११ वर्षाच्या मुलीची हत्या करून शेअर्स ब्रोकरने संपवले आयुष्य)

नक्की काय घडले? (Gold Smuggling)

डीआयआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सुदानी महिला या तीन वेगवेगळ्या विमानाने संयुक्त अरब अमिराती (दुबई) येथून सोन घेऊन आल्या होत्या. सोन्याची डिलेव्हरी कोणाला करणार होत्या याबाबतचा तपास डीआरआयकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिराती (दुबई) मधून सोमवारी मुंबईकडे येणाऱ्या विमानाने महिला प्रवाशांचा एका गटाकडून पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती.

तीन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या १८ सुदानी महिला प्रवाशांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून तपासणी केल्यावर पेस्ट, तुकडे आणि दागिने असे एकूण १६.३६ किलो सोने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेले बहुतांश सोने महिलांनी अंतरवस्त्रात दडवून आणले होते. या सुदानी महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या एका भारतीय नागरिकाला डीआरआयने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला भारतीय नागरिक हा भारतातील सोन तस्करी (Gold Smuggling) टोळीतील सदस्य असून या महिला हे सोन कोणाला देणार होत्या, आणि या टोळीचा प्रमुख कोण आहे याचा तपास डीआरआय करीत आहे.

मुंबई विमानतळावर चालू वर्षात डीआरआय आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ६०० किलो सोन जप्त केले आहे. मागील तीन वर्षांतील हा सर्वात मोठा जप्तीचा आकडा आहे. २०१९-२०२० मध्ये दिल्ली विमानतळावर ४९४ किलो सोन जप्त करण्यात आले होते, या तुलनेत मुंबईत चालू वर्षात झालेली ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. विशेष म्हणजे या सोन तस्करीमध्ये विमान कंपन्यांचे कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून गेल्या तीन वर्षात ५८ विमान कर्मचारी यांना सोन तस्करी (Gold Smuggling) प्रकरणी अटक करण्यात आली होती. विमानतळावरून सोन बाहेर काढून देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांची असायची, मोबदल्यात त्यांना मोठी रक्कम देण्यात येत होती अशी माहिती समोर आली.

मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरूसह देशातील ३९ विमानतळावर सोन्याच्या तस्करीत (Gold Smuggling) मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षात ३९ विमानतळावरून २५३१ किलो सोन अधिकारी यांनी जप्त केले असून अन्य विमानतळावरून १४५८ किलो सोन्याची जप्ती झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.