जागतिक पातळीवरील आर्थिक घसरणीचा परिणाम भारताच्या माहिती- तंत्रज्ञान (IT) क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांकडून नवीन मनुष्यबळाच्या भरतीत लक्षणीय घट दिसून आली आहे.
( हेही वाचा : Sharad Pawar : उद्धव ठाकरे यांना डावलून शिंदे आणि पवार यांच्यात चर्चा!)
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस(टीसीएस), इन्फोसिस आणि एचसीएल टेक या देशातील तीन आघाडीच्या आयटी (IT) कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या भरतीत मागील आर्थिक वर्षात तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
IT कंपन्यांमधील मनुष्यबळ घटले
- टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसकडून चौथ्या तिमाहीत मनुष्यबळात झालेली वाढ
- जानेवारी- मार्च २०२२ मधील वाढ ६८ हजार २५७ आहे. तर याच्या तुलनेत २०२३ मधली वाढ ८८४ इतकी होती.
टीसीएस (TCS)
- २०२१-२२ मध्ये केलेली कर्मचाऱ्यांची भरती = १ लाख ०३ हजार ५४६
- २०२२- २३ मध्ये केलेली कर्मचाऱ्यांची भरती = २२ हजार ६००
इन्फोसिस
- २०२१-२२ मध्ये केलेली कर्मचाऱ्यांची भरती = २९ हजार २१९
- २०२०-२१ मध्ये केलेली कर्मचाऱ्यांची भरती= ५४ हजार ३९६.
एचसीएल टेक
- २०२१-२२ केलेली कर्मचाऱ्यांची भरती = १७ हजार ०६७
- २०२०-२१ मध्ये केलेली कर्मचाऱ्यांची भरती= ३९ हजार ९००
कंपन्यांकडून मनुष्यबळात होणारी वाढ ही त्यांच्या नवीन कामाच्या मागणीची निदर्शक असते. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपन्यांवर असणारा दबाव या आकडेमोडीवरून स्पष्टपणे समोर आला आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community