ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर “अटकेच्या भितीने ते भाजपसोबत गेले” अशी खोचक टीका केली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या टीकेला ट्विटरच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे.
( हेही वाचा : महाविकास आघाडीच्या सभेला स्थानिकांचा विरोध, ‘वज्रमुठ’ सभेविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी)
काय म्हणाले नितेश राणे?
“जेलच्या भितीने शिंदे साहेब भाजप बरोबर गेले…मग पेग्विंन आणि UT ने (उद्धव ठाकरे) दिशा सालियन केसच्या भितीने कोणा – कोणाचे हातपाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’…” असे ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1646191870538813440
यापूर्वीही केले आहेत आरोप
दिशा सालियन प्रकरणावरून याआधीही अनेकदा नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने पुन्हा एकदा नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्वीटच्या शेवटी राणेंनी ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ असे लिहिले आहे यावरून ते काय गौप्यस्फोट करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community