world cancer day 2022 : मागील तीन वर्षांत कर्करोगाने किती झाले मृत्यू?

104

४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने जनजागृती करण्यात येते, पण त्यातून तंबाखूचे व्यसन बाळगणा-यांवर परिणाम होतो का, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात २०१८ ते २०२० या तीन वर्षांत तब्बल २५ हजार २८४ कर्करोगग्रस्तांना जीव गमावावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. २०१९-२० या काळात सर्वात जास्त मृत्यू हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून सुमारे साडेचारशे ते पाचशे मृत्यू तीन वर्षांत नोंदवले गेले. मात्र मुंबईची माहिती उपलब्ध झालेली नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकारातून तब्बल ३४ जिल्ह्यांतील कर्करोगाशी लढा देणा-या रुग्णांच्या मृत्यूबाबत हा धक्कादायक खुलासा समोर आला. एकीकडे कर्करोग निवारणासाठी सरकार विविध उपकम राबवत असताना प्रत्यक्षात मृत्यूची आकडेवारी वाढत असल्याचे आढळत असल्याचे माहिती अधिकारातून समोर येत आहे.

(हेही वाचा धक्कादायक! वन्यजीवांच्या शिकारीकरता गुन्हेगारांसाठी लॉकडाऊन ठरली ‘संधी’)

गेल्या तीन वर्षांतील मृत्यूची संख्या

  • २०१७-१८ – ७ हजार ८५०
  • २०१८-१९ – ८ हजार ७००
  • २०१९-२० – ८ हजार ७३४

पाहा कोणत्या जिल्ह्यात वर्षागणित सर्वात जास्त मृत्यूची नोंद झाली

वर्ष – जिल्हा – मृत्यूची संख्या

  • २०१७-१८ – नाशिक – ४०६
  • २०१८-१९ – पुणे – ४८२
  • २०१९-२० – ५१७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.