मोदींनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…

67

आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. लोकसभेत साधारण तासभऱ चाललेल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरकारने ४० वर्षांत गरिबी तर हटवली नाही, पण गरिबांनी काँग्रेसला हटवलं, अशी टीका करत मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले. यावेळी मोदी म्हणाले, देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक काँग्रेसने सुधारली पाहिजे, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

मोदींनी राज्यसभेत केलेल्या भाषणात विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांना डिवचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एक-दोन नाही तर चक्क तीनवेळा कौतुक केले आहे.

काय म्हणाले मोदी…

शरद पवार आपल्या राज्यातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम करतात, २०१४ ला सत्ता गेल्याने डोळ्यासमोर काजवे चमकले. देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. काही लोकांना भारताचे यश भारताचे वाटत नाही. लसीकरणावर व्यर्थ खर्च होत असल्याचे सांगितले गेले. कोरोना काळात सरकारने संसाधने वाढवण्याचा प्रयत्न केला. सर्वांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला.

…तर पवारांकडून शिका

यापुढे ते असेही म्हणाले, सत्तेत असलो तरच देशाची चिंता करायची आणि नसलो तर देशाची चिंता करायची नाही असे असते का? कोणाकडून शिकता येत नसेल, तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करता आहे. मात्र, त्यातही ते आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. आपल्याला नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही नाराज होत असाल, तर तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथले लोकही उदास होतील.

(हेही वाचा – काँग्रेसने केला मंगेशकर कुटुंबीयांवर अन्याय… मोदींचा गंभीर आरोप)

पण शरद पवार आले

देशाची कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत होते. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांशी २३ बैठका घेतल्या. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून सादरीकरण व्हायचे. त्यावेळी काही लोक आले नाही. बहिष्कार टाकण्यात आला. पण शरद पवार आले, टीएमसीचे लोक आले. हे संकट मानव जातीवर आलेले. तुमचे सल्लागार कोण आहेत, आधुनिक चिकित्सा परंपरा आणि भारतीय चिकित्सा परंपरेवर काम केले, आयुष मंत्रालयानं खूप काम केले, असा गौरव त्यांनी राज्यसभेत केला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.