राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असताना, आठवड्याभराच्या ब्रेकनंतर पुन्हा ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गुरूवारच्या नोंदीत १२१ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. नागपूर, वर्धा, पुणे शहर, सिंधुदुर्ग, धुळे, लातूर, अमरावती तसेच यवतमाळमध्ये ओमायक्रॉनने पुन्हा डोके वर काढल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
इतकी झाली नोंद
१२१ रुग्णांच्या जनुकीय अहवालांपैकी ८४ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था तर ३७ रुग्णांचा अहवाल बी. जे वैद्यकीय महाविद्यालने दिला. आता राज्यात ३ हजार ४५५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आजपर्यंत नोंदवली जात आहे. त्यापैकी २ हजार २९१ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
शुक्रवारी राज्यातील ओमाक्रॉनच्या रुग्णांची जिल्हानिहाय नोंद –
नागपूर – ८२
पुणे शहर – ९
वर्धा – १४
सिंधुदुर्ग – ८
धुळे, लातूर, अमरावती आणि यवतमाळ – प्रत्येकी २
राज्यात केवळ ७० हजार १५० कोरोना रुग्ण
राज्यात ६ हजार २४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १८ हजार ९४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे वाढल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community