मागच्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियाची परिस्थिती चिघळत चालल्याची स्थिती होतीच. पण आता अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. युक्रेनची राजधानी कीव तसेच अन्य महत्त्वाच्या शहरांवर रशियाने तोफा डागल्याचेही वृत्त समोर आले आहे. रशियाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तिस-या महायुद्धाची सुरुवात झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
युक्रेनच्या राजधानीवर कब्जा
युक्रेनविरोधात सैन्य कारवाईचे आदेश पुतिन यांनी दिल्यानंतर, रशियाच्या सैन्य दलाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या सैन्याने शरण यावं, असं पुतिन यांनी आवाहन केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चाललेल्या चर्चेत रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती. अखेर गुरुवारी सकाळी रशियाने युक्रेनच्या राजधानीसह अन्य महत्त्वाच्या शहरांवर मिसाईलने हल्ला चढवला आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या विमानतळावर रशियाने कब्जा केल्याचा दावा करण्यात येत आहे.
( हेही वाचा: बापरे! बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आगीत जळून खाक! )
आणीबाणी घोषित
अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे कच्च्या तेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. या हल्यानंतर युक्रेनने देशात आणीबाणी घोषित केली आहे. युक्रेनची सर्व विमानतळ बंद करण्यात आली आहेत. युक्रेनच्या कीव, खारकीव, ओडेशा आणि मारियूपोलमध्ये रशियाकडून तोफा डागण्यात आल्या आहेत. रशियाने युक्रेनच्या 13 शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
Join Our WhatsApp Community