जम्मू – काश्मिरात कसे ठार झाले दोन दहशतवादी?

77

जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शुक्रवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. अमशीपोरा गावात सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात लष्कर-ए-तोयबाच्या  2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

दहशतवाद्यांना कंठस्नान

अमशीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने या परिसरात शोध मोहिम सुरु केली. गावाला घेराव घातल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान घरांची झडती घेत असताना, गोळीबार सुरु झाला. याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांनी यश आले.

(हेही वाचा राज्यशासन ‘त्या’ झोपडपट्ट्यांची जबाबदारी घेणार नाही!)

अद्याप अधिकृतरित्या माहिती नाही

जवळपास दोन तास ही चकमक सुरु होती. या दोन्ही दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. चकमकीत ठार झालेले दोघेही दहशतवादी हे स्थानिक असल्याची माहिती आहे. अद्याप चकमकीबद्दल अधिकृतरित्या दहशतवाद्यांची नावे किंवा इतर माहिती सांगण्यात आलेली नाही. दोघांना ठार केल्यानंतर, सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरु ठेवली होती. मात्र परिसरात आता कोणी दहशतवादी लपला नसल्याची खात्री झाल्यानंतर शोध मोहिम थांबवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.