छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ ने का दिला पाठिंबा?

80
मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ ने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, व नोकऱ्यामधील नुकसान कमी व्हावे, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. १७ जून २०२१ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत. आठ महिने झाले तरी या मागण्यांची आंमलबजावणी झाली नाही. राज्य सरकारने या मागण्यांची तात्काळ आंमलबजावणी करावी, तसेच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी न्या.भोसले समितीने केलेल्या शिफारशींची आंमलबजावणी करण्यास सुरवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी  ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.

काय आहे डबेवाल्यांची भूमिका? 

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यांचे डबेवाल्यांना सर्वात जास्त वाईट वाटले. कारण डबेवाले मावळ मराठा आहेत. या आरक्षणाचा लाभ आम्हाला ही होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा यज्ञ मांडला तेव्हा त्या यज्ञांत सर्व प्रथम आहुती आम्ही मावळ्यांनी दिली. स्वराज्याच्या स्थापनेत आम्ही आमचे योगदान दिले. ऐक काळी एका हातात ढाल व एका हातात तलवार घेऊन गड किल्ले चढणारे आम्ही काळाच्या ओघात मुंबईत दोन्ही हातात जेवणाचे डबे घेऊन पायऱ्या चढून डबे पोहचवू लागलो. मराठा आरक्षण जाहीर झाले होते, या आरक्षणाचा फायदा नक्कीच आमच्या मुलांना होईल असे आम्हाला वाटत होते आमच्या मुलांना शाळा, कॅालेजमध्ये प्रवेश सुलभतेने मिळेल व प्रवेश शुल्क व फी मध्ये सवलत मिळेल. मुले शिकतील पुढे नोकरीत आरक्षण मिळेल नोकऱ्या मिळतील…या आरक्षणाने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला विकासांचे नवे दालन खुले झाले होते. पण असे वाटत असताना न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यामुळे आमच्या सर्व आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.