छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वक्तव्यावर आठवले म्हणाले…

90

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले असून माफी मागण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले आठवले…

राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत, ते योग्य नाही. परंतु, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे आठवले म्हणाले.

(हेही वाचा – पुणेकरांची ‘अशी’ होणार वाहतूक कोडींतून मुक्तता)

पिंपरीत महापौर भाजपचा

याबरोबरच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये 39 जागा आम्हाला द्या. आणि बाकीच्या तुम्ही घ्या. किती घ्यायचे ते पाहू पण एवढ्या नकोत. ज्या – ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता चांगला झाला आहे. त्या ठिकाणी आम्हाला तिकीट द्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणायची आहे. भाजपचा महापौर झाला तर आमचा उपमहापौर झाला पाहिजे. पुण्यात आमचा उपमहापौर आहे. पिंपरीत सत्ता आली तर उपमहापौर आम्हाला पाहिजे, स्टँडिंग आम्हाला पाहिजे. असे मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.