केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचं पवारांनी केलं स्वागत

86

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत तेथील भारतीयांच्या सुरक्षेबाबत वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका ही योग्य असून त्यावर टीका करण्याची गरज नाही, असं पवार यावेळी म्हणाले. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपरुन राजकारण करण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर सुखरुप मायदेशी परत आणणे गरजेचे आहे, असे देखील पवार म्हणाले.

केंद्राच्या निर्णयाचं स्वागत

भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत या युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली. भारताच्या या भूमिकेमुळे युक्रेनी नागरिक भारतीयांवर नाराज असल्याचे समजत आहे. परंतु केंद्र सरकारने घेतलेली ही भूमिका योग्य असून त्यावर टीका-टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. असे विधान करत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

(हेही वाचाः केंद्र सरकार घसरतंय… शरद पवारांचं मोठं विधान!)

युक्रेन हा सुंदर देश

वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, युक्रेन, चीन वैद्यकीय शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यामागे काही कारणे युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे. मी सुद्धा त्याठिकाणी गेलो आहे. तेथे शैक्षणिक हब असल्यामुळे विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. परराष्ट्र मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्याशी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्यांच्यावरुन कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

सामांन्यांना युद्धाची झळ बसणार

युक्रेन आणि रशिया मधील संघर्ष ही फार मोठी गंभीर बाब आहे. यामुळे देशवासीयांना भाववाढीच्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होणार याचीही मला चिंता लागली आहे. सूर्यफुल हे महत्त्वाचं खाद्य तेल देणारं पीक आहे. युक्रेनमध्ये त्याचं मोठं उत्पादन होतं. त्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किंमती वाढतील, त्याची झळ सामान्य लोकांना बसेल. त्यात केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

(हेही वाचाः मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनमध्ये अखेर युद्धविराम, पण….)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.