महिला दिनी जाणून घ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे मार्ग!

87

पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांचे मार्गदर्शनाखाली “महीला दिनाचे निमीत्ताने” वसंत हॉल येथे “घे उंच भरारी” या महाविदयालयीन विदयार्थीनीकरीता विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यात महीलांना “पोलीस खात्यात महीलांना संधी” यावर सहा.पोलीस आयुक्त पुनम पाटील यांनी “सायबर गुन्हे व महिला, सोशल मिडीयाचा सुरक्षित वापर” या विषयावर सपोनि रविंद्र सहारे यांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तर याच कार्यक्रमात २२ लाख ८३ हजार रुपयांचे एकूण १५३ मोबाईल्सचा शोध घेऊन मोबाईल हे मोबाइल मुळ मालकांना वितरीत करण्यात आले.

मार्गदर्शन करण्यात आले

आपला हरवलेला मोबाईल प्राप्त झाल्याने, उपस्थितांना अतिशय आनंद झाला असून, सर्वांनी त्याबाबत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व अमरावती शहर पोलीस दलाचे मनापासून आभार व्यक्त केले. सोबतच सायबर समुदपेशन गुन्हे, सोशल मीडिया हॅन्डलींग, गुगल सर्च फॉड, ओएलएक्स फॉड, रिमोट कंट्रोल ऍप्स, क्युआर कोड फॉड, युपीआय फॉडबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच सदर प्रकारापासून सावध राहण्यासाठी करण्याच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

( हेही वाचा #महिलादिन२०२२ : महिला दिनानिमित्त शिक्षणमंत्र्यानी केले आवाहन! )

असे व्हा सावध

नागरीकांना पोलीस आयुक्तालयातर्फे सुचित करण्यात येते की, सायबर गुन्हेगार हे आपल्याला फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड डिटेल्स, ओटीपी विचारून फसवणूक करतात त्यामुळे कोणालाही आपल्या बँक खात्याची, डेबीट / क्रेडीट कार्डची माहीती देउ नका, आलेला ओटीपी सांगू नका. काही सायबर गुन्हेगार हे तुमचे मोबाईलमध्ये Any Desk, Team Viewer, Quick Support, Airdroid अॅप्लीकेशन डाउनलोड करायला सांगून त्यातून तुमच्या मोबाईलचा ताबा मिळवतात व परस्पर बॅक व्यवहार करून आपली फसवणूक करतात. त्यामुळे आपल्या मोबाईलवर कोणाच्या सांगण्यावरुन वरील ऍप इन्टाल करू नका. सायबर गुन्हेगार हे ओएलएक्सवर आर्मी/सीआयएसएफ/एसआरपीएफ अश्या सुरक्षा दलातील कर्मचारी असल्याची बतावणी करून मोबाईल / मोटरसायकल /कार / फर्निचर अश्या वस्तुची खरेदी /विक्री करण्याचे नावावर फसवणूक करत आहेत. तरी प्रत्यक्ष वस्तू पाहील्याशिवाय किंवा व्यक्तीला भेटल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करू नका. फोनपे/पेटीएम/गुगलपे वर केवायसी तसेच कॅशबॅकच्या नावावर फसवणुकीचे प्रकार घडत असून, अनोळखी इसमाकडून कॉल करून, केवायसी किंवा कॅशबॅकची बतावणी करून नोटीफिकेशनमध्ये जाऊन पे करण्यास सांगीतले जाते व फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा अनोळखी मोबाईल कॉल्स पासून सावध रहावे. वरील बाबत काही एक तक्रार असल्यास, तत्काळ सायबर पोलीस स्टेशन अमरावती येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.