रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीयांच्या जेवणाच्या ताटावर परिणाम!

97

रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या युद्धाची झळ आता दैनंदिन जीवनात तसेच सामान्य नागरिकांनाही बसत आहे. रशिया-युक्रेन या दोन्ही देशांना ‘गव्हाचे कोठार’ असे संबोधले जाते. हे दोन्ही देश प्रामुख्याने युरोपीय देशांना गहू निर्यात करतात. परंतु आता युद्धजन्य परिस्थितीमुळे हा पुरवठा बंद झालेला आहे. गव्हाची निर्यात पूर्ववत होण्यास खूप वेळ लागणार आहे.

( हेही वाचा : एसटी महामंडळात रुजू होण्यासाठी महिलांना आणखी प्रतिक्षा! )

चपातीचा घास महागणार 

रशिया-युक्रेनमधून होणारा गव्हाचा पुरवठा बंद झाल्यामुळे, युरोपीय देशांमध्ये भारतातील गव्हाची मागणी वाढली आहे. भारतातून गव्हाची निर्यात कमी होते परंतु गेल्या दोन वर्षात भारतातून होणाऱ्या गव्हाच्या निर्यातीत वाढ झालेली आहे.  मागणी वाढल्यामुळे गव्हापासून बनवणाऱ्या पदार्थांचे भावही वाढणार आहेत. गव्हापासून प्रामुख्याने चपाती, रोटी बनवली जाते त्यामुळे आता गव्हाचे भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या जेवणाच्या ताटातील चपातीचा घास सुद्धा महागणार आहे.

स्थानिक बाजारपेठेला झळ

भारतातील गव्हाच्या भावात क्विंटलमागे तब्बल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच रवा, सुजी, मैदा यांचेही भाव वाढले आाहे. रशिया-युक्रेनकडून होणारी अन्नधान्यांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने स्थानिक बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात युद्धाची झळ बसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.