कौतुकास्पद! बायो एलएनजी स्टेशनसाठी गडकरींचा पुढाकार

91

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नुकताच मानस अॅग्रो व लिफिनिटी बायो एनर्जी यांच्यात अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यांतर्गत आता तीन ठिकाणी बायो एलएनजी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात देशातून इंधनावर होणारा खर्च कमी होणार असून प्रदूषणाने होणारी हानीही रोखता येईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

डिझेलवर चालणारी बस जैवइंधनावर चालणार

बायो एलएनजीची (जैव इंधन) निर्मिती कृषी कचरा, सेंद्रीय कचरा, उद्योगांमधील कचरा, घरामधून निघणारा कचरा यापासून निर्माण केले जाते. याचा वापर डिझेल वाहनांमध्ये केल्यास प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास मदत होणार आहे. याची निर्मिती ज्या घटकांपासून होणार आहे. ते घटक या देशातील शेतकर्यांपासून मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकतात.यामुळे शेतकर्यांना शेतमालाशिवाय निर्माण होणार्या कचर्यापासून अधिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते, देशातील इंधनाची गरज भागवली जाऊन विदेशातून इंधन मागविण्यासाठी खर्च होणारा 8 ते 10 लाख कोटींचा खर्च कमी करता येईल. या जैव इंधनावर वाहने चालविण्याचा सफल प्रयोग नुकताच पार पडला असून आयएसओ मानक 15500 या अंतर्गत डिझेलवर चालणारी बस पूर्णपणे जैवइंधनावर चालविण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

(हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध)

पर्यावरणाला मदत होण्यासाठी गडकरी प्रयत्नशील

या जैव इंधनाचा वापर वाढावा व पर्यावरणाला मदत व्हावी यासाठी केंदीय मंत्री नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील मासळ येथे जैव इंधन केंद्र उभारले जाणार असून या शिवाय नागपूर व रायपूर येथेही अशा केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. सोबतच नागपूर व रायपूर दरम्यान पहिली जैव इंधनावर चालणारी बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहने जैवइंधनावर चालविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा मनोदय नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.