इंडिया गेटवर उभारणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा, पंतप्रधानांची घोषणा!

127

दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केली. संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवताना आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रेनाइटचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारताविषयी कृतज्ञ असल्याचे प्रतिक असणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

ही योग्य श्रद्धांजली

पंतप्रधान पुढे म्हणाले की, नेताजी बोस यांचा भव्य पुतळा पूर्ण होईपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याठिकाणी असेल. नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करेन. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या नेताजींना ही योग्य श्रद्धांजली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

अमर जवान ज्योतीच्या वादात पंतप्रधानांची घोषणा 

अमर जवान ज्योतीबाबत इंडिया गेटवर वाद सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. सरकारने अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या (नॅशनल वॉर मेमोरियल)  ज्योतीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.

पुन्हा एकदा ज्योत पेटवू

आपल्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझणार आहे, हे अत्यंत दुःखद असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा पेटवू असं राहूल गांधी म्हणाले.

( हेही वाचा: तुम्ही वीजबिल भरलं का? नाहीतर वीज पुरवठा होणार खंडित! )

म्हणून अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली

१९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या, भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी अमर जवान ज्योतीचे उद्घाटन केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.