मध्यप्रदेश: आता सुराणा गावातून एकही हिंदू स्थलांतरित होणार नाही!

126

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सुराणा गावात दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. सुराणा गावातून हिंदू लोकं स्थलांतरित व्हा, असे फलक गावकऱ्यांनी घरांवर लावले होते, मात्र आता ते फलक काढण्यात आले आहेत. यासोबतच गावातून हिंदूंचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर हिंदू समाजातील लोकांनी घराबाहेरील घर विक्रीचे फलक हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्पुरत्या पोलीस चौकीची उभारणी

दोन्ही समाजाशी चर्चा केल्यानंतर प्रशासनाने गावात तात्पुरती चौकी उभारून लोकांवर लक्ष ठेवता यावे यासाठी १३ सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. प्रशासनही त्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या गावात शांततेचे वातावरण आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! चुरी कोळश्याच्या जागी चांगल्या दर्जाच्या कोळश्याची उचल)

अवैध अतिक्रमणे शोधून प्रशासनाकडून कारवाई

शहजाद अली यांनी सरकारी जमिनीवर बांधलेली सहा दुकाने, मंदिराजवळ अब्दुल कलाम यांचे पुत्र इब्राहिम खान यांनी बांधलेले स्नानगृह आणि नाल्याजवळ दिनेश, हिरालाल आणि भीमराव जाट यांनी बांधलेली सीमा भिंत यासह काही अतिक्रमणे प्रशासनाने हटवली आहेत. आणखी काही अवैध अतिक्रमणे शोधून प्रशासनाकडून कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.