कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनचे रुग्ण महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. या रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे शहरात होती. पण शनिवारी झालेल्या नोंदीनुसार आता मुंबईने पुणे शहराला मागे टाकत, ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत आघाडी घेतली आहे.
राज्यात शनिवारी 416 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले
राज्यात शनिवारी तब्बल 416 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले. त्यापैकी मुंबईने ओमायक्राॅनच्या रुग्णांवर आघाडी घेत, एका दिवसात मुंबईमध्ये 321 नव्या ओमायक्राॅनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे इतके दिवस ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत पुढे असणा-या पुणे शहराला मुंबईने मागे टाकले आहे. पुण्यात शनिवारी ओमायक्राॅनचे रुग्ण जास्त होते. पुण्यात 113 रुग्ण आढळले होते. या नव्या नोंदीमुळे एकूण रुग्णसंख्येतही मुंबईने पुण्यापुढे आघाडी घेत, ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत पुणे शहराला मागे टाकले आहे.
( हेही वाचा: शपथेचा भंग केल्यानं मविआचं मंत्रिमंडळ बरखास्त करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी )
मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या
मुंबईत आतापर्यंत ओमायक्राॅनचे 1 हजार 9 रुग्ण आढळले. पुण्यात 1 हजार 2 रुग्ण दिसून आले. त्याखालोखाल नागपूरला आतापर्यंत 118 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यभरात सध्या 1 हजार 529 ओमायक्राॅनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र राज्यभरातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 2 हजार 759 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community