सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘या’ सुविधा द्या, भाजपाची मागणी

वैद्यकीय सुविधा याठिकाणी मिळाल्यास पश्चिम उपनगरातील नागरिकांना एक विशेष रुग्णालय प्राप्त होणार

114

मुंबई महापालिकेने ताब्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार केले. त्यामुळे कोविड रूग्णांवर योग्य उपचार आणि लसीकरण मोहीम यशस्वी राबवल्याने या रुग्णालयाची वेगळी ख्याती निर्माण झाली आहे. त्यामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या कॅथ लॅब, रेडिएशन थेरपी, न्यूक्लीअर मेडिसीन, नेप्रॉलॉजी, एन्डोक्रिनोलॉजी, न्यूरॉलॉजी, आदी आरोग्य विषयक सोयी सुविधांचा वापर करून हृदय विकार, कॅन्सर, किडणी, मेंदू, डायबेटीज, थायरॉईड आदी गंभीर आजारांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे या वैद्यकीय सुविधा याठिकाणी मिळाल्यास पश्चिम उपनगरातील नागरिकांना एक विशेष रुग्णालय प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – ‘किचन पॉलिटीक्समधून बाहेर या’, नवाब मलिकांवर क्रांती रेडकर भडकल्या)

कोविड काळामध्ये मरोळ, अंधेरी विभागातील सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा मुंबई महानगरपालिकेने पूर्ण क्षमतेने वापर करून विशेष करून उपनगरातील कोविडग्रस्त नागरिकांना अतिशय उत्तम आरोग्य सुविधा देऊन अनेकांचे प्राण वाचविले. तसेच पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणादरम्यान दर दिवशी किमान हजार नागरिकांचे लसीकरण केल्याने भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन केले. सामंत यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ पर्यंत ज्यावेळी कोविडचा प्रभाव ओसरू लागला होता, त्यावेळी सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे किमान २०० बेड्स हे कोविड व्यतिरिक्त उपचाराकरिता वापरण्यात आले होते आणि त्या दरम्यान हृदयविकार, किडणी, मेंदू विषयक अशा जटील आजारांच्या रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या गेल्या होत्या.

गरीबांना उच्च प्रतीची सुविधा होणार उपलब्ध 

परंतु, मार्च २०२१ नंतर कोविडने पुन्हा एकदा उचल खाल्ल्यामुळे कोविड व्यतिरिक्त उपचारांच्या सुविधा बंद करण्यात आल्या. सध्या ऑक्टोबर २०२१ मध्ये आपण मुंबईमध्ये कोविडवर बरीचशी मात केली आहे आणि कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होत चालले आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन माझी आपणांस विनंती आहे की, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या कॅथ लॅब, रेडिएशन थेरपी, न्यूक्लीअर मेडिसीन, नेप्रॉलॉजी, एन्डोक्रिनोलॉजी, न्यूरॉलॉजी, आदी आरोग्य विषयक सोयी सुविधांचा वापर करून हृदय विकार, कॅन्सर, किडणी, मेंदू, डायबेटीज, थायरोईड आदी आरोग्य विषयक सोयी सुविधांचा वापर करून हृदय विकार, कॅन्सर, किडनी, मेंदू, डायबेटीज, थायरॉईड इ. गंभीर आजारांवर उपचार करण्याकरिता मुंबईतील विशेष करून पश्चिम उपनगरातील गरीब नागरिकांना ही उच्च प्रतीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.