ज्ञानेश्वर माऊलींसह तुकाराम महाराज पालखीचं तळ असलेल्या विठू माऊलींच्या पंढरपुरात तब्बल २३ बियर शॉपींना मंजुरी देण्यात आली आहे. वाखरी ग्रामसभेत बियर शॉपींना मंजूरी दिलेल्या या धक्कादायक निर्णयानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. वाखरी ग्रामसभेत या बियर शॉपींना ना हरकत परवाना देण्याचा ठराव मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या विसाव्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या वाखरी गावात ग्रामसभेने महिलांचा विरोध डावलून २३ बिअर शॉपी सुरू करण्यास ना हरकत ठराव मंजूर केला आहे. यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या भूमिकेला विरोध
वाखरी ग्रामपंचायतीच्या या भूमिकेनंतर राज्यातील समस्त वारकऱ्यांसह महिलांनी या निर्णयाविरोधात आक्रमक होत नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बियर शॉपी धारकाकडून तब्बल १ लाख रूपये ग्रामनिधी घेऊन हा परवाना देण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला जोरदार विरोध होत असून या २३ बियर शॉपींना ना परवानगी देण्याचा ठराव रद्द करण्याची चांगलीच मागणी होताना दिसतेय.
(हेही वाचा -पोलिसांच्या तुटपुंज्या बोनसवरून अमित साटम आक्रमक)
ठराव रद्द करण्याची मागणी
वाखरी ग्रामपंचायतीचा हा ठराव रद्द न झाल्यास राज्यभरातील महिलांसह वारकरी संतप्त झाले आहेत. तसेच यासंदर्भात ग्रामपंचायतीविरोधात आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देखील राज्यभरातील महिलांसह वारकऱ्यांकडून देण्यात येत आहे. विठू माऊलीच्या पंढरपूरात गावकऱ्यांनी अनोखा ठराव केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून सर्वत्र या अजब ठरावाची चर्चा सुरू असल्याचे दिसतेय.
Join Our WhatsApp Community