…म्हणून साहित्य संमेलनस्थळी धडकणार ‘सावकरांच्या साहित्याची दिंडी’

96

९४ व्या मराठी साहित्य संमेलनातील गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख न केल्याने समस्त राज्यातील वीर सावरकर प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर वीर सावरकर प्रेमींकडून राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसांत हा निषेध अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नाशिक येथे पार पडणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलन गीतात भूमिपुत्र वीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने पोस्टकार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निषेधाची पत्रे सावरकर प्रेमींकडून पाठवली जाणार आहेत.

….म्हणून लिहिणार निषेधाचे पोस्टकार्ड

दौंड येथील मृत्युंजय प्रतिष्ठानचे सचिव विकास देशपांडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना योग्य तो सन्मान न दिल्याने संताप व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीवर आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावरकराचं नाव साहित्य संमेलन गीतात वगळल्याने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, वीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, परंतु त्याच्या गाण्यात वीर सावरकरांचा स्पष्ट उल्लेखही नाही. त्यामुळे देशभरातील वीर सावरकरप्रेमी आता पोस्टकार्डद्वारे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेला निषेध पत्र लिहिणार आहेत, असे विकास देशपांडे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – ‘वीर सावरकरां’चा विसर; नाशिककर आक्रमक)

वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणार दिंडी

इतकेच नाही तर ३ डिसेंबर २०२१ रोजी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ नाशकातून करण्यात येणार आहे. त्याच समस्त नाशकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या साहित्याची दिंडी काढण्यात येणार आहे. या साहित्याची दिंडी नाशकातील वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणार असून मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी त्यांचा समारोप करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गाण्यात स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख नसल्याबद्दल येथील जनतेने गुरुवारी संताप व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.