Care Of Liver: ‘अशी’ घ्या लिव्हरची काळजी

लिव्हर ६० टक्के ते ७० टक्के खराब होऊनही ऑपरेशन शिवाय पूर्ववत होऊ शकते. पण या लिव्हरकडे वेळीच लक्ष दिले नाही तर कोणालाही दुर्धर रोग होऊ शकतात. (Care Of Liver)

185
Care Of Liver
Care Of Liver: 'अशी' घ्या लिव्हरची काळजी

अनेक जण वर्षातून न चुकता एकदा तरी आरोग्य तपासणी करून घेतात. तपासणीचा रिपोर्ट हाती आल्यावर काही जणांना धक्का बसतो. बऱ्याचदा आजारांशी लढा देणारे, फॅट कमी करण्याचे कार्य करणारे लिव्हर खराब झाल्याचे रिपोर्टमधून समोर येते. तेव्हा हा प्रश्न उभा राहतो, की मद्यपान न करणाऱ्यांना सुद्धा लिव्हरचा त्रास होऊ शकतो का? तर याचे उत्तर ‘हो’ आहे. त्यामुळे शरीरातल्या या महत्त्वाच्या अवयवाची काळजी घेणे आवश्यक ठरते. (Care Of Liver)

डॉक्टर म्हणाले की…

लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन यांनी सांगितले की, “लिव्हर प्रत्योरोपणाच्या शस्त्रक्रिया करतो त्यात २५ टक्के लोक हे दारू प्यायल्याने लिव्हर खराब झालेले असतात. त्यामुळे मी दारू पित नाही म्हणजे मला लिव्हरचा त्रास होणार नाही हा समज डोक्यातून काढून टाका.” (Care Of Liver)

धोक्याची घंटा दूर नाही

लिव्हर ६० टक्के ते ७० टक्के खराब होऊनही ऑपरेशन शिवाय पूर्ववत होऊ शकते. पण या लिव्हरकडे वेळीच लक्ष दिले नाही तर कोणालाही दुर्धर रोग होऊ शकतात. रोगांमध्ये यांचा समावेश होतो…
– लिव्हरला सूज येणे
– लिव्हर सिरोसिस
– लिव्हर फेलियर
– लिव्हर कॅन्सर

(हेही वाचा – Tips For eyes Care : ‘या’ टिप्स वापरून घ्या उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी

ही लक्षणे ओळखा

– तळहात प्रमाणापेक्षा जास्त लाल होणे
– पोटात पाणी साठणे
– चेहरा, पायाला सूज येणे
– रक्ताच्या उलट्या होणे
– त्वचा व डोळे पिवळ्या रंगाचे होणे

साध्या गोष्टी, मोठा बदल (Care Of Liver)

लिव्हरची काळजी घेण्यासाठी मोठमोठे बदल करण्याची आवश्यकता नाही. जीवनशैलीत केलेले लहान बदल सुद्धा भविष्यात होणारे लिव्हरचे त्रास रोखतील. त्यासाठी हे बदल आताच करा..

– नियमितपणे व्यायाम करा
– जंक फूड टाळा
– लसूण, हळद, सफरचंद, गाजर यांचा समावेश करा
– हिरव्या पालेभाज्या नियमितपणे खा
– धूम्रपान, मद्यपान करू नका
– ग्रीन टी प्या
– लिंबू सरबत प्या

(आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.