मुंबईत फिरताय? सावधान! सायको किलर्सचा वाढतोय धोका

दोन महिन्यांत दोघांना अटक

113

मुंबईतील फुटपाथवर राहणाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठल्या क्षणी एखादा खुनी येऊन आपली हत्या करून जाईल, अशी भीती फुटपाथवर राहणाऱ्यामध्ये पसरली आहे. मागील दोन महिण्यात फुटपाथवर राहणाऱ्या तीन ते चार जणांच्या हत्या झाल्या असून या हत्या करणाऱ्या दोन सायको किलर्सना मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून अटक केली आहे. या दोघांवर यापूर्वी देखील हत्या केल्याचे गुन्हे दाखल असून एक किलर तर नुकताच तुरुंगात बाहेर आला होता आणि त्याने घाटकोपर पूर्व येथील फुटपाथवर राहणाऱ्या एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

असा घडला प्रकार

२ नोव्हेंबर रोजी घाटकोपर पूर्व पंतनगर भाजी मार्केट चौक या ठिकाणी दोन इमारतीच्या मध्ये एका ४० वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. या महिलेवर शाररिक अत्याचार केल्याचा प्रयत्न करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५ देखील संलग्न तपास करीत होते. कक्ष ५ च्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक इसम संशयितरित्या घटनास्थळी फिरत असल्याचे दिसून आले कक्ष ५चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.सुशांत बंडगर, अर्चना पाटील, संजय जगताप, अमोल माळी, जयदीप जाधव, पोउनि. लक्ष्मण वडरे, अंकुश न्यायनिर्गुणे, यादव,साळुंखे आणि पथकाने यया संशयित इसमाचा शोध सुरू केला. तपास पथकाने या इसमाची माहिती काढली असता हा इसम गेल्याच महिण्यात तळोजा तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती समोर आली. ४ वर्षांपूर्वी नवीमुंबईतील वाशी या ठिकाणी फुटपाथवर झोपणाऱ्या महिलेवर त्याने अत्याचार करून तिचा खून केला होता,या प्रकरणात त्याला अटक होऊन तो तुरुंगात होता, अशी माहिती समोर आली.

चौकशीतून झाले उघड

पोलिसानी मुंबई,आणि नवीमुंबईतील फुथपाथ, रेल्वे स्थानकावर त्याचा शोध घेतला असता मानखुर्द रेल्वे स्थानका बाहेर तो गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळून आला. त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. या महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तीने त्याला विरोध करताच त्याने तिची हत्या केली व तेथून निघून गेला अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. अटक करण्यात आलेला खुनी हा फुटपाथवर राहतो आणि कचरा गोळा करण्याचे काम करतो, त्याच्यावर नवीमुंबईत एक खुनाचा गुन्हा दाखल असून त्याने या प्रकार फुटपाथ वर राहणाऱ्या महिलांची हत्या केल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

(हेही वाचा – झाकीर नाईकच्या संघटनेवर केंद्राची ‘ही’ मोठी कारवाई)

कोणतेही कारण नसताना त्याने केली हत्या 

दरम्यान गेल्या महिन्यात जे.जे.मार्ग पोलिसांनी एका सायको किलरला अटक केली आहे. त्याने भायखळा येथे फुटपाथवर झोपलेल्या इसमाच्या डोक्यात रात्रीच्या सुमारास सिमेंटचा पेव्हरब्लॉक टाकून खून केला, त्यानंतर काही वेळाने जे.जे. उड्डाणपूल खाली झोपलेल्या एका इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि मृत देहापासून १०० मीटरवर जेवण करीत बसला होता. जे.जे.मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने कुर्ला येथे पाच वर्षांपूर्वी पुलाखाली झोपलेल्या व्यक्तीची हत्या केली होती, त्या प्रकरणात त्याला अटक देखील झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने दक्षिण मुंबईत आसरा घेतला होता. या सर्व हत्या करण्यामागे कुठलेच कारण नव्हते अशी माहिती समोर आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.