भारत आणि न्यूझीलंडची नुकतीच टी-20 क्रिकेट मालिका झाली. या मालिकेत भारताने न्यूझीलंडला धूळ चारली आणि मालिका 3-0 अशी जिंकली. आता येत्या गुरुवारपासून भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांची कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. याच कसोटी मालिकेतून भारत आपले गमावलेले अव्वल स्थान पुन्हा मिळवू शकतो. त्यासाठी न्यूझीलंड संघाला पराभूत करावे लागणार आहे. भारताला या कसोटी मालिकेत आपला आक्रमकपणा कायम राखावा लागणार आहे. तरच भारताला पुन्हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची संधी मिळेल.
भारत दुस-या क्रमांकावर
न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका येत्या गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरु होत आहे. ही मालिका भारताला 1-0 किंवा 2-0 अशी जिंकावी लागणार आहे. सध्याच्या क्रमवारीनुसार भारतीय संघ 119 रेटिंग गुणांसह दुस-या स्थानावर आहे. ज्या न्यूझीलंडकडून भारताने हे स्थान गमावले होते, ते न्यूझीलंड 126 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. कानपूरमध्ये होणारा पहिला सामना भारताने जिंकला, तर भारताला 5 गुण मिळतील आणि त्याच वेळी न्यूझीलंडचे 5 गुण कमी होतील. अशा प्रकारे भारत मिळालेल्या 5 गुणांसह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आपले स्थान निश्चित करु शकेल.
जागतिक कसोटी क्रमवारी
- न्यूझीलंड 126 गुणांसह पहिल्या क्रमांक
- भारत 119 गुणांसह दुसरा क्रमांक
- ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह तिसरा क्रमांक
- इंग्लंड 107 गुणांसह चौथ्या क्रमांक
- पाकिस्तान 92 गुणांसह पाचवा क्रमांक
(हेही वाचा : पेंग्वीनच्या देखभालीचा लाभार्थी पुन्हा ‘हाय – वे’च… )
Join Our WhatsApp Community