कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना त्रास दिला अथवा मानसिक छळ केला, अशा घटना वारंवार घडत असताना, अलिकडेच पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला कामगारांना त्रास देणाऱ्या कंपनीत मनसेने जोरदार दणका दिला आहे. वॉशरूमला जाण्यासाठी चक्क लेटर (पत्र) लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कंपनीचा ‘तालिबानी’ फतवा असल्याची चर्चा सुरु होताच मनसेने चांगलाच कंपनीला झटका दिला.
कंपनीच्या मॅनेजरचा गलिच्छ प्रताप
पुण्यातील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत महिला कामगारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे वॉशरुमला जाणाऱ्या महिलांकडून पत्र लिहून घेतले जात होते. हा गलिच्छ प्रकार घडवून आणणाऱ्या कंपनी मॅनेजरचा प्रताप कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला. या प्रकरणाची मनसे कार्यकर्त्यांनी दखल घेतली आहे.
( हेही वाचा : ट्विटरचे अग्रवाल यांचे ‘ते’ ट्विट पुन्हा आले चर्चेत )
तक्रार दाखल करणार
घडलेल्या प्रकाराबद्दल या कंपनीच्या मॅनेजरला मनसे माथाडी कामगार अध्यक्ष नीलेश माझिरे यांनी जाब विचारला. मनसेने दणका दिल्यावर मॅनेजरने या गलिच्छ प्रकाराची कबुली दिली. पोंड पोलिस ठाण्यामध्ये महिला कर्मचारी कंपनीविरोधात तक्रार करणार आहेत. कंपन्यांमध्ये महिलांवर अन्याय झाल्यास मनसे स्टाईलने कंपन्यांना उत्तर देणार, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community