तीन कारखान्यांमध्ये 45 लाखांची वीजचोरी

90

वीजचोरीच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच एक  घटना महावितरणच्या भरारी पथकांनी उघडकीस आणली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करून पुण्याच्या तीन कारखान्यांमधील 2 लाख 93 हजार 216 युनिटची म्हणजे 45 लाख 64 हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकांनी नुकतीच उघडकीस आणली. वीजचोरीच्या तीनही प्रकरणांमध्ये वीजचोरी व दंडाचे एकूण 84 लाख 84 हजार रुपयांचे वीजबिल दिले आहे.

रिमोटच्या साहाय्याने केली वीजचोरी

पुणे शहरातील खडी मशीन रस्त्यावरील फायबर ग्लास इंड. एक्यूपमेन्टस् या औद्योगिक ग्राहकानेदेखील मंजूर वीजभारापेक्षा अधिक वीजवापर करीत रिमोटच्या साहाय्याने गेल्या 15 महिन्यांत 74 हजार 534 युनिटची म्हणजेच 12 लाख 50 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. वीजचोरी व दंडाचे या ग्राहकास 17 लाख 60 हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे.

मीटरमध्ये फेरफार करत केली चोरी

तसेच, भोसरी एमआयडीसीमधील प्रिसिशन टेक्नॉलॉजी अँड हिट हिटर्स या औद्योगिक ग्राहकानेदेखील मंजूर जोडभारापेक्षा अधिक वीज वापरली. इतकच नाही तर मीटरमध्ये फेरफार करून गेल्या सात महिन्यांमध्ये 1 लाख 10 हजार 490 युनिटची म्हणजेच 16 लाख 79 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. वीजचोरी व दंडाचे या औद्योगिक ग्राहकास 40 लाख 19 हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे.

 ( हेही वाचा: 1 कोटीचा रस्ता बांधला अन् उद्घाटनावेळीच खड्डा पडला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.